Thursday, 4 May 2017

फोटोग्राफर म्हणजे काय.....??

फोटोग्राफर म्हणजे फीरता वारा...

फोटोग्राफर  म्हणजे वाहता झरा...

फोटोग्राफर म्हणजे रात्री एकटाच अंधारात चमकनारा तारा...

 फोटोग्राफर  अंगावरील शहारा...

फोटोग्राफर कार्यक्रमाचा पहारा...

फक्त फोटोग्राफर आहे सुख अन दु:खाचा सहारा...

फोटोग्राफर जन हिताचा नारा...

फोटोग्राफर आहे अनमोल हिरा...

फोटोग्राफर म्हणजे धाक अन् दरारा...

त्याचाच आहे वचक सारा...

काहीही करु शकतो
फोटोग्राफर
जर असेल तो
          खरा...

फोटोग्राफर  वर प्रेम करुन पहा....

एकदा तरी फोटोग्राफर वर प्रेम करुन पहा...

मनापासुन त्याच्यावर तुम्ही मरुन पहा...

               जीवाला जीव देईल तुमच्या
         त्याचा हात धरुन पहा...

              त्याचं नाव काळजावर
         एकदातरी कोरुन पहा...

कसा जगतो एकटा
तुम्ही अवश्य पहा...

प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा...

          त्याच्या सारख्या यातना
         एकदा तरी सोसुन पहा...

          अनोळखी जगात तुम्ही
           एकटे बसुन पहा...

दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा...

त्याच्या सारखे तुम्ही
दिवसभर ऊभे राहुन पहा...

         एकदा तरी
फोटोग्राफर वर
          प्रेम करुन पहा...

          तो रोज मरतो तुम्ही
          एकदातरी मरुन पहा...

लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा...

तुम्हाला काय वाटतं तुम्ही
फोटोग्राफर च्या यातना सोसुन पहा...


     एकदा तरी   फोटोग्राफर वर...
          तुम्ही प्रेम करुन पहा